Wednesday, 14 March 2018

हास्य ही सहारा है


                                                                    हास्य ही सहारा है 
जिंदगी हो गई है तंगदस्त
और तनावों ने उसे
कर दिया है अस्तव्यस्त,
मस्ती की फ़हरिस्त
निरस्त हो गई है
और हमारी हस्ती
अपनों के धोखे में
पस्त हो गई है।
अब कोई ऐसा सिद्धहस्त
सलाहकार भी नहीं
जो हमारी त्रस्त जीवनशैली को
आश्वस्त कर सके
या हमारे सपनों का रखवाला
सरपरस्त बन सके।
ऐसे में मात्र एक ही सहारा है
हमारे जीवन की शुष्क धरा पर
केवल हास्य ही
उभरता हुआ चश्मा है, धारा है।
यही हमारे दुखों को देगा शिकस्त
और करेगा हमें विश्वस्त
कि आओ, हास्य-कविताएँ पढ़ो
और हो जाओ मदमस्त।

Tuesday, 13 March 2018

हरवलेले बालपण आणि भरकटलेली तरुणाई

‘प्यार तो होना ही था’ या चित्रपटातील एक वाक्य आहे की “जिंदगी मे हर इन्सान को एक बार प्यार जरुर करना चाहिये, क्यूकी प्यार इन्सानको बहोत अच्छा बना देता है।” प्रेम ही एक अत्यंत सुंदर भावना आहे. प्रेमात पडल्यावर माणूस जणू एका पॉझिटिव्ह एनर्जीने भारला जातो. सगळे जग सुंदर वाटू लागते, नवी उमेद निर्माण होते. काही तरी सकारात्मक करून दाखवण्याची उर्मी बळावते. जिच्यावर प्रेम करतो तिच्यासाठी काय करू आणि काय नको असे होऊन जाते.
व्यक्तिमत्वामध्ये अमूलाग्र बदल होतो. मुड चांगला राहतो. चेहऱ्यावर सतत एक स्मित वास्तव्य करून असते. आत्मविश्वास दुणावतो. प्रसंगी तिच्यासाठी जीवाची बाजीही लावली जाते. इतके चांगले बदल एखादी व्यक्ती केवळ आवडू लागल्यावर घडू लागतात. त्या व्यक्तीने प्रेमाचा स्वीकार केल्यावर तर आकाशच ठेंगणे होऊन जाते! मग नक्की असे काय होते की एवढे सगळे चांगले बदल झालेले असताना तिच्या एका नकारामुळे मनातील प्रेम कापरासारखे उडून जाते?

शेती म्हणजे कुबेराचं देणं नव्हे

शेती म्हणजे काय असतं, हे शेतीत राबल्याशिवाय, शेतीसाठी पैशांची जमवा-जमव केल्याशिवाय कळतं नाही, शेतीत काम करून आलेला बाप, जेव्हा हातापायाची हाडं दुखतात, रात्रीचा कण्हत उठून बसतो, त्याच्या पोराला आणि त्या बापाला विचारा शेती म्हणजे काय असते आणि काय अडचणी येतात.
शेतकऱ्यांना लुबाडणारे दलालही म्हणतील शेतकरी नाडला जातो, आणि शेतकरी नाडला जात नाही असं म्हणणाऱ्यांना काय म्हणावं? मुळात शेती हा विषय इंग्रजी पुस्तक मराठीत भाषांतरीत करण्यासारखा साधा सोपा नाही. कुंथत कुंथत संपादकीयचे रकाणे भरण्यासारखाही शेतीचा विषय सोपा नाही.
शेती कोणताही राजकीय पक्ष, संघटनेच्या विचारांचं गुलाम राहून, त्यांची वेळोवेळी दलाली करून करता येत नाही. शेतीत शेतमजूर, अल्पभूधारक, जास्त जमीन असलेले शेतकरी असा भेदभाव करता येत नाही.

शेतकरी काही टीव्हीवर दिसण्यासाठी चमकोगिरी करत नाही, कारण तुम्हाला आमंत्रण पाठवलंय का शेतकऱ्यांनी, आम्ही रडतोय दाखवा आम्हाला टीव्हीवर, आमचा फोटो पेपरवर लावा?पाऊस पडला तर सर्वांच्या शेतात, गारपीट, ऊन, पिकांवरील रोग सर्वांच्याच शेतात येतात, राजकीय पक्षांची दलाली करण्यासाठी इथे हिंदू-मुस्लिम, मराठा-माळी असा भेद करून शेतीचं दुकान चालवता येत नाही, शेतीत राबतांना मानेपासून माकडहाडापर्यंत घाम वाहत येतो, तेव्हा शेती फुलते, एवढं करूनही निसर्गाने साथ दिली नाही, तर शेतकरी डोळ्यात अश्रू आणणारच, त्याला अधिकार नाही का तेवढा ही?
शेतकरी निसर्ग वागेल तशी गणितं आखतो जगण्यासाठी. कुणाचं सरकार, कुणावर दबाव आणायचा, हे गणित तुम्ही आखतात. बड्या धेंडांची, मंत्र्यांची खोटी-खोटी शाबासकी मिळवण्यासाठी. यासाठी तुम्ही वेळोवेळी शेतकऱ्यांच्या दु:खाचं भांडवल केलं, तेव्हा त्याला विचारलं होतं का? 'शेतकऱ्या खोटारडा, तू हे सर्व खोटं खोटं रडतोय?' कारण गारपीट ही काय पहिल्यांदाच झाली नाही.
तुमच्या न्यूज पेपरच्या गिऱ्हाईकाला तुम्हाला आता मीठ नाही, तर दररोज तुम्हाला साखरच विकायची असेल तर तिथे शेतकऱ्यांची काय चूक.
शेतकरी कष्टाने शेती करतो, नुकसान सहन करण्याची ताकदही त्याच्यात आहे, पण तो आपल्यासारखी दलाली करू शकत नाही. एवढीच त्याची चूक आहे.
आंबा भरपूर येणार आहे, डाळिंबे छानच झाली आहेत वा द्राक्षे मुबलक येणार आहेत, या वाक्यांवरून तुमचा पाय शेतीला लागलेला दिसत नाही, भरपूर आंबा येणार यापेक्षा आंब्याला चांगला मोहोर आलाय, डाळिंबाची फलधारणा यंदा चांगली झालीय, फळांचा आकार एक सारखा आहे, असं शेतकरी म्हणत असतो.
'डाळिंबे छानच झाली आहेत', असं म्हणायला काय तो वरण भात आहे?, 'आंबा भरपूर येणार आहे', असं म्हणायला तो काय दिवाळी बोनस आहे का?, 'द्राक्षे मुबलक येणार आहेत', असं म्हणायला ते काय पीएफवरचं व्याज आहे का?
थोडक्यात शेतीत निश्चित काहीच नाही, शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास कधीही जाऊ शकतो, तो तुमच्या ताटातल्या पदार्थापासून, पीएफच्या व्याजासारखा निश्चित नाही.
नगदी पिकं घेणाऱ्या शेतकऱ्यांनी किती कर्ज काढून शेती फुलवली, नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डकडून कर्ज घेऊन शेतकऱ्यांनी किती फळबागा फुलवल्या, तिथे धनदांडगा हा शब्द शेतकऱ्यांना आला कुठून?, शेतकऱ्यांनी फळबागांना जी औषधं दिली? त्याची उधारी किती आहे? हे तुम्हाला कृषी केंद्रावर जाऊन कळेल, ते नुकसान झालेल्या फळबागांवर दिसणार नाही.
जास्तच जास्त शेतकरी इमानदार म्हणून त्याला लाखांच्या वस्तू उधार मिळतात, पण आपली ऐपत मॉलवाल्याकडे नाही, तुम्हाला कंपनीने लाखाचा पगार दिला, त्यात तुम्ही होमलोन घेतलं, कार घेतली, मुलांच्या शिक्षणाची फी भरली..... आणि अचानक हा पगार बंद झालाय आणि पुढील वर्षी बरोबर या महिन्यात भेटा, असं तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला दाढी स्ट्रिमिंग करायलाही पैसे शिल्लक राहणार नाहीत. तेव्हा तुम्हाला रस्त्यावरचा भिकारीही म्हणेल चांगला धनदांडगा होता, आता तर दाढीही करत नाही.
शेतकऱ्यांनी एवढी वर्ष कमावलेलं कुठं टाकलं हे विचारतांना, किती अडचणींचा त्याने सामना केला, मुलांना त्याने काय शिकवलं, मुलीचं लग्न केलं का नाही, केलं तर खर्च केला असेलच ना? केला असेल त्याच्या ऐपतीप्रमाणे, आपल्यासारखं अंगूर रबडीचं जेवण देता आलं नसेल त्याला. तुम्ही तुमच्या मुलाच्या लग्नात पाहुणमंडळीला आईस्क्रिम खायला देता, पण धनदांडगा आणि खोटारडा म्हणून शेतकऱ्याच्या इज्जतीचा फालुदा का करता?
शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे, असं म्हणणाऱ्यांना वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवायला हवं? कारण २००७ साली झालेल्या कर्जमाफीच्या प्रकरणांची छाननी करा, स्वत:ला तुम्ही बडे पत्रकार म्हणून मिरवून घेतात, म्हणून हा कधीतरी थोडासा अभ्यास करा, असा शेतकरी दाखवा ज्याला १०० टक्के कर्जमाफी झालीय. जी कर्जमाफी झालीच नाही, त्याचं कौतुक त्याला काय सांगताय, आणि तीही काही शेतकर्‍यांनी मागितली नव्हती, आणि थोडी थोडकी दिली असेल तर ती काय तुमच्या बाबाच्या पगारातून त्याला मिळाली. हा अभ्यास का पी. साईनाथ यांच्यासारख्या पत्रकारांनीच करायचा का? पी. साईनाथ यांच्यासारखं शेतीत जाऊन पाहा, अभ्यास करा आणि मग लिहा.
कारण एकीकडे भारत हा शेतीप्रधान देश आहे असं म्हणतांना शेतकरी हा सतत गुलाम राहिला पाहिजे, त्याला संपादकीयचे रकाणे भरण्यासाठी बडवून काढला पाहिजे, असा विचार करून कसं चालेल.
'बळीराजा', 'काळीआई' ही बिरूदं तुम्ही मिरवली, कारण तुम्हाला सर्वांना दाखवायचं असतं, आमच्याकडे किती शब्दसंपदा आहे, त्यासाठीही त्याचा वापर केला. तो तुमचा धंदाच आहे, पोटभरायचा.
आपण स्वत:ला अर्थशास्त्री म्हणवून मिरवतात, म्हणून शेतकरी किती प्रमाणात पिकं कर्ज घेतात, वर्षभराच्या आत किती भरणा करतात, बँकांना याचा किती फायदा होतो, अर्थव्यवस्थेला याचा किती फायदा-तोटा आहे, हे देखील तपासून पाहा. उलट उद्योजकांना किती दीर्घकालीन कर्ज दिलं जातं, ते किती परत फेड करतात हे देखील पाहा.
अगदी भारतात बँकिंग क्षेत्राचा विकास होत असतांना राष्ट्रीयकृत बँकांना कुणी मजबूत केलं त्याचाही अभ्यास करा, तेव्हा कृषिक्षेत्र नव्हतं का?, शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यासाठी काय काय त्रास घ्यावा लागतो हे देखील पाहा.
मृगनक्षत्राचा पाऊस आला, जमीनीचा सुगंध डोक्यात भरल्यावर शेतकरी पेरता होतो, वेळेवर पेरायला हवं हेच त्याच्या डोक्यात असतं, मग त्यासाठी वाटेल ते तो करतो, कुठूनही पैसा उभा करतो, तो काळ्या मातीला आई म्हणत असेल तर त्याचं काय चुकलं, तो दगडाला देव तर म्हणत नाही ना.
शेतकऱ्याकडे चार पैसे खुळखुळत असतील तर ते कुबेराचं देणं नाही, ते कष्टाचं देणं आहेशेतकरी आमचा बाप आहे, 

चला परत लहान होऊयात

आईबाबा होणे हा निसर्गाने दिलेला सन्मान आहे. पण सध्याच्या धकाधकीच्या जीवनात पालक म्हणतात कि मुलांना वेळ देता येत नाही. त्यामुळे त्यांना समजून घ्यायला आपल्याकडे पुरेसा वेळ नाही. यामुळे मुले एकलकोंडी होतात असा समज झाला आहे.
आम्ही दोघे पण नोकरी करतो. आम्हाला पण साडे चार वर्षाचा मुलगा आहे. पण जेव्हा वेळ मिळतो, तेव्हा आम्ही पण त्याच्या सोबत लहान होतो. त्यामुळे आमच्यासाठी रोजच बालदिन असतो. त्याचे हसणे, रडणे, मस्ती, खोडकरपणा, रुसणं, फुगणं हे सगळ आम्ही पण त्याच्या सोबत लहान होऊन त्याला समजावत असतो. यासाठी मुलांना काय आवडतं आणि काय नाही हे शोधणं आवश्यक आहे.
२१ व्या शतकातील मुले ही खूप हुशार, चंचल आहेत, मल्टी टॅलेन्टेड आहेत. त्यामुळे त्यांना समजून घेणे पण अवघड असत . त्यांचे प्रश्न कधी अशी असतात कि यावर आपल्या कडे उत्तर नसते. पण आपल्या मुलांबद्दल आपणच अभ्यास केला तर या सर्व गोष्टींचा मार्ग आपोआपच मोकळा होतो. आयुष्याचा आनंद घेण्याचा, मौजमस्ती करण्याचा हक्क या मुलांना पण आहे. हा हक्क मिळालेल्या आपल्या नशीबवान मुलांनी आपल्या आनंदात इतरांनाही सहभागी करून घेण्याबाबतची जाणीव ठेवणे आवश्यक आहे.
पालकांनी ही जाणीव आपल्या मुलांच्या मनात रुजवली तर भारताचे भावी नागरिक सुज्ञ आणि समजूतदार बनतीलच शिवाय कायमच वंचित आणि नकारात्मक जगणे वाट्याला आलेल्या एखाद्या दुर्दैवी बालकालाही आपल्या ह्या प्रयत्नांमुळे चांगले आयुष्य मिळू शकेल. आपण सगळ्यांनी हे सुजाण पालक म्हणून स्वीकारलात तर ही पिढी नक्कीच सुसंस्कारित होईल.
मुला-मुलींना सुरक्षित आणि प्रेमाच्या वातावरणात वाढवले गेले पाहिजे. मुले निरागसच असतात, त्यांना त्यांचे आयुष्य फुलवण्याची संधी त्यांना मिळाली पाहिजे. फुलपाखरांसारखं बागडू द्यायला पाहिजे, कच्च्या मडक्याला जसा आकार देऊ तसे ते मडके घडत असते. तसेच मुलांना जसे आपण घडवू तसेच ते घडत जाणार. शेवटी चागलं-वाईट, योग्य-अयोग्य हे सांगायला तर आपणच आहोत.

Best Poem In Nature

आयुष्य जरी एक दिवसाचे
काम त्याचे लाख मोलाचे
सुख दुःखात असतो सोबती
फुलांची ही थोर महती
घेवू शिकवण आपण फुलांकडून
सुख दुःख वाटू सर्व मिळून
आयुष्यात असेल आपल्याही सुगंध
दृढ होतील ॠणाणुबंध

Sunday, 11 March 2018

Marathi Kavita


मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं…….

तुम्ही म्हणाल , यात विशेष काय घाडलं?
त्यालाच कळेल, ज्याचं असं मन जडलं……..
तुमचं लग्न ठरवुन झालं?
कोवळेपण हरवुन झालं?
देणार काय? घेणार काय?
हुंडा किती,बिंडा किती?
याचा मान,त्याचा पान
सगळा मामला रोख होता,
व्यवहार भलताच चोख होता..
हे सगळं तुम्हाला सांगुन तरी कळणार कसं
असलं गाणं तुमच्याकडं वळणार कसं
ते सगळं जाउ द्या, मला माझं गाणं गाउ द्या..
मी तिला विचारल,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं…….
त्या धुंदीत,त्या नशेत, प्रत्येक क्षण जागवला,
इराण्याच्या हॉटेलात,
चहासोबत मस्कापाव मागवला
तेवढीसुद्धा ऐपत नव्हती,असली चैन झेपत नव्हती,
देवच तेव्हा असे वाली,खिशातलं पाकीट खाली
त्या दिवशी रस्त्याने सिंहासारखा होतो हिंडत
पोलिससुद्धा माझ्याकडे आदराने होते बघत
जीव असा तरंगतो तेव्हा भय असणार कुठलं?
मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं…….
मग एक दिवस,
चंद्र, सुर्य, तारे, वारे,
सगळं मनात साठवलं,
आणि थरथरणाऱ्या हातांनी ,
तिला प्रेमपत्रं पाठवलं
आधिच माझं अक्षर कापरं
त्या दिवशी अधिकचं कापलं
रक्ताचं तर सोडाच राव
हातामधलं पेनसुद्धा होतं तापलं
पत्र पोस्टात टाकलं आणि आठवलं,
पाकिटावर तिकिट नव्हतं लावलं
पत्रं तिला पोचलं तरिसुद्धा
तुम्हाला सांगतो,
पोष्टमन तो प्रेमात पडला असला पाहिजे,
माझ्यासारखाच त्याचासुद्धा कुठेतरी जीव जडला असला पाहिजे
मनाच्या फ़ांदीवर,
गुणी पाखरु येउन बसलं
मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं……
पुढे मग तिच्याशिच लग्नं झालं,मुलं झाली,
संगोपन बिंगोपन करुन बिरुन शिकवली
मी तिच्या प्रेमाखातर नोकरीसुद्धा टिकवली
तसा प्रत्येकजण नेक असतो,
फ़रक मात्र एक असतो
कोणता फ़रक?
मी तिला विचारलं,
तिनं लाजून होय म्हटल,
सोनेरी गिरक्या घेत, मनात गाणं नाचत सुटलं…….


Good Quotes

It's all about quality of life and finding a happy balance between work and friends and family.

Best Status

गंजण्यापेक्षा‬ झिजणे केव्हाही चांगले ! यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.

Marathi Status

जग‬ जिंकण्यासाठी Attitude‬ नाही
‪‎फक्त‬ दोन गोष्टी पूरेश्या आहेत
गोड_स्वभाव आणि ‪Cute_Smile‬...

love is beutiful



हमेँ कँहा मालूम था क़ि इश्क़ होता क्या है,
बस एक ‘तुम’ मिले और ज़िन्दगी मुहब्बत बन गई
.

हास्य ही सहारा है

                                                                    हास्य ही सहारा है   जिंदगी हो गई है तंगदस्त और तनावों ने उसे कर ...